Political
आ.यशवंत माने यांनी घेतली मनोज जरांगे -पाटील यांची भेट

सोलापूर – मराठा आरक्षणयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी भेट घेऊन सत्कार केला.
यावेळी लोकनेते शुगरचे अध्यक्ष बाळराजे पाटील उपस्थित होते. माढा विधानसभा मतदारसंघातील रणजितसिंह शिंदे, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सिध्दाराम म्हेत्रे यांनी देखील जरांगे यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जाते.