PoliticalSolapur

पहिल्याच पदयात्रेत महायुतीचे देवेंद्र कोठे यांचे शक्तीप्रदर्शन, मतदारांकडून झाले स्वागत 

 

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारामध्ये आघाडी घेत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी पहिल्याच पदयात्रेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी दाजी गणपती येथे श्री गणरायाचे पूजन करण्यात आले. यानंतर ढोल ताशांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या निनादात पदयात्रेला प्रारंभ झाला.

 

भारतीय जनता पार्टीचे शेले, टोप्या परिधान करून पक्षाचे ध्वज घेऊन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा हाती घेऊन भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारतमाता की जय, जय श्रीराम, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.

 

दत्तनगर येथील दाजी गणपतीपासून सुरुवात झालेली पदयात्रा मार्कंडेय रुग्णालय, श्री साईबाबा मंदिर, श्रीराम मंदिर, श्री बालाजी मंदिर, कुचन नगर, दत्तनगर, गिरी झोपडपट्टी, संयुक्त झोपडपट्टीमार्गे व्हीवको प्रोसेसमार्गे सरगम हॉटेल जवळ विसर्जित झाली.

 

या पदयात्रेत माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, शहर मध्य संयोजक दत्तात्रय गणपा, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका राधिका पोसा, रामेश्वरी बिर्रू, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, नागेश सरगम, सुधाकर नराल, सावित्रा पल्लाटी,

 

मोनिका कोठे, डॉ.राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, वैशाली गोली, सुधाकर नराल, इंदिरा कुडक्याल, महिला मोर्चा शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, रमेश यन्नम, कुरुहिनशेट्टी समाज शिक्षण संस्था अध्यक्ष प्रभाकर गोरंटी, दत्तात्रय पोसा, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष अंबादास बिंगी, शिक्षक आघाडीचे शहर अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नागनाथ सोमा, रविंद्र नक्का, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा लक्ष्मी बदलापूरे, ओबीसी मोर्चा शहर सरचिटणीस श्रीनिवास जोगी, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, आनंद बिर्रू, पुरुषोत्तम पोबत्ती, भीमाशंकर बिराजदार, भीमाशंकर जवळे, भाजपा सोशल मीडिया शहर संयोजक अभिषेक चिंता, शहर मध्य विधानसभा अंबादास साकिनाल, सहसंयोजक भास्कर बोगम आदी उपस्थित होते. या पदयात्रेत नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button