
सोलापूर – सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ हत्तूर येथील ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.
प्रचार सभेत संतोष पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तालुक्यातील धनाढ्य आणि प्रस्थापित नेत्यांनी स्वार्थासाठी केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे आणि परस्परपूरक भूमिका तालुक्याचा विकास खुंटला आहे. स्वार्थी राजकारणाला आळा घालण्याची गरज आहे. तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून जनतेने सजग होऊन, प्रस्थापित नेते आणि घराणेशाही विरोधात ठाम भूमिका घेत परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन केले.
जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने आपण आमदार होऊन सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी,कामगार ,बेरोजगार यांचे प्रश्न सोडवेन. तसेच मतदारसंघाचा जो विकास रखडला आहे. तो विकास पूर्णत्वास घेऊन पाणी प्रश्नासह बेरोजगारांच्या हाताला एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे काम करेन. आपला गाव भेट दौरा सुरू आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत असून जनतेच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आतिश बनसोडे, सोमलिंग कणपडियर, बिळेंनी कनपडियर, बंडप्पा पाटील, राजू गडदे, काकासाहेब माने, रवींद्र इंगळे, भरमन्ना गावडे, प्रकाश पवार, लक्ष्मण राठोड, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष – विजयकुमार गायकवाड , शहराध्यक्ष प्रशांत गुडेवार ,सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख , सह सचिव – शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक उत्तम दिलपाक, विक्रम गायकवाड, सायरा शेख , असिफ यत्नाळ, संतोष राठोड , अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार, आदी उपस्थित होते.