
सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता सोलापुरात मागास सेवा मंडळ चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज, नेहरूनगर, विजापूर रोड येथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती सोलापूर दक्षिण चे उमेदवार संतोष पवार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.
जिल्ह्यातील बुद्धिजीवी, आरक्षणवादी, ओबीसी, एससी, एसटी, भटके विमुक्त, शाहू फुले आंबेडकर यांना मानणाऱ्या बांधवांनी मोठ्या संख्येने या सभेत उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.