घरकुल परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध, आमदार देशमुख यांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

सोलापूर – महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ क्रमांक 11मधील जुना वीडी घरकुल परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला.
घरकुल भागात रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. मागील पाच वर्षात राज्य शासनाचा विशेष निधी आणि जिल्हा नियोजन च्या माध्यमातून नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला. मागील पाच वर्ष पासून या भागाचा चेहरा बदललेला आहे. घरकुलचा विकास करतो म्हणून या भागातील जनतेला येथील नेत्यांनी फसविलं आहे. एका वर्षात चार पक्ष बदलून या भागातील जनतेची निष्ठा अनेक पक्षाच्या दारावर वाहिली. मागील पाच वर्षापासून या भागात होत असलेल्या कामामुळे येथील जनता समाधानी आहे. यापुढेही घरकुलच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे विजय इप्पाकायल, सतीश भरमशेट्टी यांनी घरकुलच्या विकासासाठी मतदान करण्याचा आवाहन केले ही पदयात्रा सग्गम नगर, पायलट रोड, योगेश्वर नगर, भारत नगर, सरवदे नगर, चाकोते नगर, ब्रम्हनाथ नगर, मुळेगाव रोड, पिट्टा नगर, शिरालिंग नगर, राघवेंद्र नगर, राज मेमोरियल स्कूल, वैष्णव मारुती, पेदा गणपती मंदिर, जुना बिडी घरकुल या या परिसरात काढण्यात आली.
सतीश भरमशेट्टी, विनोद केंजरला, राजू हिबारे, सतीश सिरसुल्ला , रुचिरा मासम, प्रकाश म्हता, रुपेश कुमार भोसले, दीपक जाधव, अनिल कचरे, नितीन साळुंखे, रमेश सुंचू, हर्षल माळवदकर, नरेश गोरे, राजू पानगंटी, संजय साळुंखे ,माधव चव्हाण ,मल्लू हिरेमठ, शंभुलिंग फुलारी,चन्नवीर हिरेमठ ,सोमनाथ हिरेमठ, सौरभ क्षीरसागर, ओमकार पत्तेवार, राहुल सुत्रावे ,नागेश कापसे, आकाश शेट्टी, रवी नाद्रगी, ओमसी पल्ली, राहुल धोमा, दिनेश धोत्रे, प्रशांत जाधव आदी पदयात्रेत सहभागी झाले होते.
○ जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी
घरकुल भागात अनेक विकास कामे केली असल्याने या भागातील नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून आमदार देशमुख यांचे आभार मानले.ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून जागोजागी महिलांनी औक्षण केले.