
सोलापूर : केंगाव येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडला. सिंहगड पब्लिक स्कूलच्या भव्य प्रांगणात हा सोहळा पार पडला.
या क्रीडा स्पर्धा 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. त्याची सांगता 26 ऑक्टोबर रोजी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या उपस्थिती झाली. या स्पर्धेमध्ये कबड्डी, थ्रोबॉल, फुटबॉल, क्रिकेट व मैदानी स्पर्धा अशा विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. सिंहगड पब्लिक स्कूलच्या भव्य प्रांगणात हा सोहळा पार पडला.
स्पर्धेमध्ये शाळेचे एकूण 400 स्पर्धक ज्युनियर व सीनियर गटातून सहभागी झाले होते. या क्रीडा संमेलनाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे सशस्त्र सेना बलचे असिस्टंट कमांडट कन्हैया नैथानी व सिंहगड संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, डॉ. डी.आय. नवले आणि कश्मीर सिंग उपस्थितीत होते. यानंतर सर्व संघांचे संचलन करण्यात आले व क्रीडाज्योत प्रज्वलित करून सर्व स्पर्धकांनी क्रीडाशपथ घेतली.
प्रमुख पाहुण्यांनी क्रीडांगणाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर शाळेच्या हाउसवाइज रिले रेस ने स्पर्धांना सुरुवात झाली. तसेच महिला व पुरुष पालकांसाठी देखील रनिंग रेस घेण्यात आली. सर्व विजेत्या मुलांना व पालकांना सर्टिफिकेट, ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले.
शाळेच्या शिक्षकांची क्रिकेट मॅच घेण्यात आली. ज्यामध्ये बेस्ट बॉलर चा सन्मान मंजुषा जगताप, मॅन ऑफ द मॅच चा सन्मान व बेस्ट बॅट्समन सचिन घाडगे यांना मिळाला. या सोहळ्याप्रसंगी सिंहगड संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले व इस्टेट मॅनेजर डॉ. डी. आय. नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजचे प्राचार्य निखहत शेख व उपप्राचार्य प्रकाश नवले आणि सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.