विद्यापीठस्तर टेबल टेनिस स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूट संघाचे यश

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत काॅलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन टेनिस स्पर्धा पार पडल्या. यात एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील संघाने सहभाग घेतला होता. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. संघात अब्दुल बेंद्रे, आदित्य सातपुते, कीर्तन करवा, प्रषमीत बुगड, पियुष साठे यांनी उत्तम खेळी केली.
या यशाबद्दल संस्था सचिव संजय नवले आणि प्राचार्य डाॅ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी या संघाचे कौतुक करुन सन्मान केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. अभ्यासाबरोबर खेळालाही प्राधान्य द्या, पुढे याचा फायदा होणार असल्याचा सल्ला दिला. क्रीडा शिक्षक प्रशांत जाधव आणि क्रीडा समन्वयक डॉ. करीम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.