राजकीय

लोकसभेची जागा जिंकण्याचा काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्धार

सोलापूर, दि. 28– सोलापूर लोकसभेची आगामी निवडणूक जिंकण्याचा निर्धार करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसजनांमध्ये उत्साह भरला. शुक्रवारी, काँग्रेस भवनात शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माजी पदाधिका//र्‍यांचा स्नेहमेळावा व नूतन पदाधिका//र्‍यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प केला.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आपण सर्वांनी काँग्रेसच्या प्रत्येक निवडणुकीत, आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विसरु शकत नाही. 2014 अगोदरची निवडणूक ही वेगळ्या पध्दतीने लढली जायची. त्यावेळी जनता नेत्यांचे ऐकत होती. पण आता जनता हुशार झाली आहे. जनतेपर्यंत जाऊन त्यांची कामे केली तरच निवडणुकीत निभाव लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासने दिली पण एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत.

उलट महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर प्रचंड वाढले, महिला अत्याचार, कोरोना काळातील अपयश, विडी व यंत्रमाग कामगारांचे हाल, यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. पाच राज्यातील सर्व्हेमध्ये काँग्रेस पुढे आहे. 2019 ची निवडणूक मोदींनी पुलवामा घडवून, जवानांचे रक्त सांडून जिंकली. हिंदू-मुस्लीम करत येणा//र्‍या निवडणुकीतसुध्दा पुन्हा असेच काहीतरी कांड करतील. म्हणून युवकांनी मोदी सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काय काय नुकसान झाले, हे जनतेला पटवून देण्यासाठी युवकांवर फार मोठी जबाबदारी आहे.

यावेळी प्रवक्ते प्रा. अशोक निबंर्गी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, प्रदेश सचिव पंडित सातपुते, प्रदेश युवक सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकूल, राहुल वर्धा, तिरुपती परकीपंडला, प्रवीण वाले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button