About Us
टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियाच्या या जमान्यात वृत्तपत्राची विश्वासार्हता आजही कमालीची अधिक आहे. त्यामुळेच आम्ही ‘सायं अपडेट’च्या माध्यमातून प्रिंट माध्यमांमध्ये १ मे २०२२ रोजी प्रवेश केला. सोलापूरच्या सिध्दरामेश्वरांच्या नगरीत, रूपाभवानी मातेच्या पुण्यभूमीत या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ आम्ही रोवली.
त्याला वर्षपूर्ती देखील झाली. दररोज सायंकाळी विनाखंड अपटूडेट अंक आम्ही दिला. कला, क्रीडा, साहित्य अशा सर्वच पातळीवर अंक दर्जेदार करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहिलो. सोलापूर बरोबरच उस्मानाबाद आणि लातूर आवृत्ती देखिल सुरू केली आहे भविष्यात पुणे ,ठाणे आणि मुंबई आवृत्ती सुरु करणार आहोत.आतापर्यंत वाचकांच्या हाती अंक पोहोच करत होतो यापुढे तो पोहोच करणारच आहोत.शिवाय प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर ,काॕम्प्यूटर स्क्रीनवर जगभरातील वाचकांना पाहता येणार आहे.